मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Maval लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मावळातील पाटण लेणी - एक विलक्षण सुंदर अनुभव

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यापाठोपाठ कदाचित मावळ तालुक्यातील डोंगरकपारीत सर्वाधिक लेण्या असाव्यात... नव्हे त्या आहेच. मावळ मध्ये काही सुप्रसिद्ध, तर काही अल्पपरिचित तर काही अजूनही अपरिचित अशा लेण्या आहेत. त्यामध्ये; कामशेत जवळची बेडसे लेणी, मळवली जवळील भाजे गावातील भाजे लेणी, पाटण गावातील भातराशी शिखराच्या पोटातील पाटण चा लेणी समूह, दुर्तगती महामार्गाच्या पलीकडे कार्ले बौद्ध लेणी, घोरावडेश्वर लेणी, पाल, उकसन लेणी यांसारख्या परिचित व काही अजूनही पर्यटक अभ्यासकांच्या नजरेतून दूर असलेल्या असंख्य लेण्या आहेत. यापैकी, पाटण गावाच्या डोंगराच्या मागे भातराशी शिखराच्या पोटातील पाटण लेणीची सफर व माहिती जाऊन घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तुम्ही जर मुंबईहुन रेल्वेने येणार असाल तर लोणावळा या स्थानकावर उतरावे. लोणावळ्याच्या पुढे पुणे येथे जाणाऱ्या लोकल असून ( ठराविक अंतराने) या लोकलद्वारे लोणावळ्याच्या पुढील मळवली या स्थानकावर उतरावे. स्थानकाच्या फलाट क्रमांक २ च्या दिशेने बाहेर आल्यावर मुंबई- पुणे दुर्तगती महामार्गावरून जाणारा ब्रिज उतरून डाव्या बाजूला ज...