अपरान्ताचे लेणे… भाग १ 👈 इथे वाचा. कोंदिविटे लेणी, अंधेरी कोंदिविटे लेणी मुंबई उपनगरातील अंधेरीजवळ वेरावली पर्वतावर असलेला महत्वाचा लेणीसमूह असून हा लेणी समूह कान्हेरी लेणीचे उपकेंद्र म्हणून प्राचीनकाळी कार्यरत असावे. जवळच असलेल्या कोंदिविटे गावाच्या नावावरून या समुहास कोंडीविते लेणी असे म्हटले जाते. या लेणीला महाकाली लेणी असे दुसरे नावदेखील प्रचलित आहे. लेणीच्या पायथ्याशी महाकाली मंदिर असून या मंदिराच्या गाभाऱ्यात एक देवतेचे शिल्प कोरलेल्या काम्य-स्तुपाची पूजा महाकाली म्हणून केली जाते. त्या स्तुपावर असलेली वज्रयान पंथाची रक्षक देवता महाकाळच्या नावावरून या लेणीला महाकाली लेणी असे म्हटले जाते. इसवी सन पहिल्या ते सहाव्या शतकात कोरलेल्या १९ लेणींचा गट असून पूर्वेस १५ तर पश्चिमेस ४ लेण्या आहेत. यात चैत्यगृह, भिक्खु विहार,पानपोढी यांचा समावेश होतो. यातील क्रमांक ९ ची लेणी हे चैत्यगृह प्रकारातील असून यातील थेरवाद कालीन स्तूप एका विशिष्ट वर्तुळाकार रचनेच्या आत असलेला दिसतो. त्या भिंतीला दोन्ही दिशेला मूळ दगडात कोरलेल्या जाळीदार खिडक्या असून डाव्या बाजूच्या खिडकीव...
नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीत भटकंती करताना त्यातील गडकिल्ले, लेण्या यांचा माहितीपर प्रवासवर्णन तसेच मी भेटी दिलेल्या काही प्रसिद्ध ठिकाणे, पर्यटन स्थळांची माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे.