मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Step Well लेबलसह पोस्ट दाखवत आहे

देवलोळी बदलापूर येथील १७ व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण अशी शिवकालीन चावीच्या आकाराची विहीर

तर २३ तारखेला हरेंद्र कांबळे यांचा फोन आला की; उद्या कुठे आहे म्हणून...? मी देखील उत्तरलो, काही ठरलं नाही आहे. तर ते मला म्हणाले जाऊया का उद्या बदलापूर ला एके ठिकाणी आणि मी लागलीच होकार दिला. तर ते ठिकाण होते, बदलापूर येथील देवलोळी गावात असलेली चावीच्या आकाराची विहीर अथवा बारव चे... दिनांक २४ जून ला ठरल्याप्रमाणे सकाळी ८ वाजता आम्ही दोघे बदलापूर कडे निघालो. घरून निघतो न निघतोच जोराचा पाऊस सुरू झाला. पावसाचा आनंद घेत आमचा प्रवास दुचाकीवरून बदलापूर कडे सुरू होता. तासाभरात आम्ही बदलापूर पश्चिमेला बदलापूर गावाच्या पुढे अंदाजे ४.५ किमी अंतरावर असलेल्या देवलोळी गावात येऊन पोहोचलो होतो. याच गावात आहे ही मध्युगीन काळातील ऐतिहासिक बारव. आम्ही जेव्हा गावात पोहोचलो तेव्हा पाऊस हलकासा रिमझिम बरसत होता. आता आम्ही विहिरीकडे येऊन उभे ठाकलो होतो. मध्ययुगीन कालखंडातील अंदाजे १७ व्या शतकातील ही विहीर बदलापूर चे ऐतिहासिकृष्ट्या महत्व अधोरेखित करत येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटक अथवा इतिहास प्रेमींना दर्शन देत आजही तितक्याच दिमाखात उभी आहे. या विहिरीच्या बांधणीचा कालखंड आणि त्यासंबंधीचा इतिहास समजण्य...