मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

architecture लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शिवनेरी बौद्ध लेणी - जुन्नर

प्रस्तावना:- महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. अभ्यासकांच्या मते संपूर्ण भारत भर सुमारे १२०० नोंद लेणी असून त्यामधील सुमारे ९०० ते १००० लेण्या ह्या एकट्या महाराष्ट्रात आहे. या इतक्या मोठ्या प्रमाणावर लेणी इथे महाराष्ट्रात कोरल्या गेल्या, काय कारण असेल बरे ? पुढे जाऊन अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, भारताच्या लिखित इतिहासाची सुरुवातच मुळात बौद्ध सम्राट अशोकांच्या शिलाशासनापासून होते, असे अभ्यासक अथवा पुरातत्व शास्त्राद्वारे मानले जाते. बिहार येथील बाराबार डोंगररांगेत आजीवक साठी पहिली लेणी कोरली. श्रमण परंपरेतील चारिका करणाऱ्या भिक्खुंसाठी वर्षावासात निवासासाठी लेण्यांची निर्मिती ही मुळात सम्राट अशोकांच्या काळात सुरू झाली. पुढे जाऊन बौद्धधम्म/ मताचा प्रचार व प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर आदरणीय भिक्खूगण विंध्य-नर्मदा पार करून ह्या महाराष्ट्रात उतरले. सह्याद्रीतील कातळकडे बघून त्यांच्या मनात अक्षरशः धुमारे फुटले असतील. दक्खनच्या पठारावरील अग्निजन्य (बेसाल्ट) खडक हा लेनिनिर्मितीसाठी अनुकूल असा होता. तर केवळ अग्निजन्य खडक असून लेणी निर्मि...