मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

maharashtra din लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महाराष्ट्राचा प्राचीन इतिहासाचा धांडोळा (इ.स. १३०० पर्यंत)

सर्व मराठी मनास आणि जनास ६३ व्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या मंगलमय सदिच्छा. 🙏🙏🙏 महाराष्ट्र हा महाराष्ट्र म्हणून कधी उदयास आला ? त्यास महाराष्ट्र हे नामाभिधान केव्हा प्राप्त झाले, सांगता येईल काय ? तर चला आज महाराष्ट्र दिनी त्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे भाषावार राज्यांची विभागणी होऊन मराठी भाषिकांसाठी केवळ एकमात्र राज्य दिनांक १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले. त्यासाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी या चळवळीत सुमारे १०६ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्या सर्व ज्ञात अज्ञात हौतात्म्याना विनम्र अभिवादन करून आज संपूर्ण महाराष्ट्र मधील मराठी जन आणि मन ६३ वा महाराष्ट्र दिन साजरा करत आहे. आता जसा एकसंध महाराष्ट्र आपणास दिसतो, तसे राजकिय दृष्ट्या एकसंध महाराष्ट्र राज्य कधीच अस्तित्वात न्हवते. हे महाराष्ट्र आताच्यासारखे एकसंध न्हवते मग ते कसे होते. येथील प्रदेशाला कोणते नाव होते? प्राचीन काळात आताच्या महाराष्ट्राचे स्वरूप कसे होते. यांसंबंधीचे प्राचीन उल्लेख कुठे- कुठे आलेले आहेत. सदर माहिती जाणून घेण्या...