नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे.
प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधारणत: २५०० वर्षापूर्वी या भूमीत वर्ण, जात व्यवस्थेची बीजे रोवली आहेत.
( काहींसाठी :- होय २५०० वर्षापूर्वी... आणि तुम्ही जे शोधताय ते ५००० वर्षापूर्वी आहे.)
वर उल्लेखीत या किडीने या मंगल भूमीस पोखरुन ठेवलेले आहे. कधी नव्हे ते याचा भडका उडून देशाचे काही बरे वाईट तर नाही होणार ना...याची भीती वाटते. यामुळे; देश कधी नव्हे इतका मागे गेला आहे, जातो आहे. माणूस च माणसाचा वैरी झाला आहे ते केवळ आणि केवळ जेत्यांचा आजपर्यंत लिहिलेल्या इतिहासावर विश्वास ठेवल्याने... या इतिहासावर आपण आतापर्यंत विश्वास ठेवला परंतु; याहीपुढे याच इतिहासावर विश्वास ठेऊ इच्छित असाल तर मात्र जेत्यांच्या लिहिलेल्या इतिहासावर टीका करण्याचा काही एक अधिकार तुम्हाला नाही, हे ही यावेळी नमूद करावे वाटते.
तर आता येऊ मूळ मुद्द्यावर...
भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेली सर्व महापुरुष जी कोणत्याही जात, वर्ण विरहित लढलीत. तेव्हा कुठे इतक्या वर्षाची गुलामगिरी जाऊन देश स्वातंत्र्य झाला. पण हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी व ती वेळ कधी नव्हे ती आता समस्त भारतीयांवर येऊन ठेपलेली आहे. आधुनिक भारतीय समाजाची वाटचाल जर जात, वर्ण भेदाभेद मुक्त या दिशेने व्हावी; असे जर वाटत असेल, तर हे स्वप्न साकार करण्याची उत्तरे आजपासून ५००० वर्षापूर्वीच्या इतिहासात लपलेली आहे. तो इतिहास समजून घेतला पाहिजे. समाजातील दानशूर लोकांनी ही उत्तरे ज्यांच्याजवळ आहे; त्यांना संशोधनासाठी सहकार्य केले पाहिजे, हेही यानिमित्ताने इथे प्रकर्षाने इथे नमूद करावेसे वाटते.
✍️ रोहित रा. भोसले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा