मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

किल्ले लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पेब किल्ला

किल्ले पेब विकटगड मित्रांनो, आज मी तुम्हाला या ब्लॉग च्या माध्यमातून किल्ले विकटगड अर्थात किल्ले पेब चे दर्शन घडवणार आहे.  ऐतिहासिक संदर्भ :- किल्ल्यावर असलेल्या गुहेचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी धान्यकोठारासाठी केलेला असा ऐतिहासिक संदर्भ या पेब किल्ल्याबद्दल मिळतो. तर चला माझ्यासोबत या पेब किल्ल्याच्या प्रवासाला... गडाचे नाव :- किल्ले पेब ( विकटगड ) प्रकार :- गिरिदुर्ग उंची :- समुद्रसपाटीपासून अंदाजे २१०० फूट श्रेणी :- मध्यम पायथ्याचे गाव :- नेरळमार्गे फणसवाडी जवळचे रेल्वेस्थानक :- मध्यरेल्वेवरील नेरळ रेल्वे स्थानक प्रवासाचा अनुभव :- हा ट्रेक आम्ही १७ ऑक्टोबर २०२० मध्ये केला असून नुकतेच कोरोना चे ताळेबंदी शिथिल केली होती व राज्याच्या पर्यटन विभागामार्फत खबरदारीची काळजी घेऊन पर्यटन करण्यास परवानगी देण्यात आली होती. ताळेबंदी काळात आपल्यासारख्या सह्यभटक्यांना घरी बसून अक्षरशः कंटाळा आला होता आणि कधी एकदा सह्याद्रीत मनसोक्त हिंडायला मिळतेय याची उत्सुकता लागली होती. अगदी याच वेळी माझा भटकंती मध्ये सोबत असलेला मित्र वैभव आठवड्यापूर्वी मला संपर्क करून त्या...

भिवगड – नव्याने परिचित होणारा एक अपरिचित किल्ला

भिवगड – नव्याने परिचित होणारा एक अपरिचित किल्ला मित्रांनो, तुम्ही बरोबर वाचलंय कारण ; भिवगड हा काही वर्षापूर्वी ट्रेकर्स व डोंगर भटक्यांच्या नजरेपासून अलिप्त राहिला होता. मुंबई पासून जवळ च असलेल्या या गडावर मात्र आता डोंगर भटके तसेच सह्यप्रेमींची पावले आता वळायला लागली आहे. भिवगड हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वदप व गौरकामत या गावाच्यामध्ये एक टेकडीवजा किल्ला आहे. इथे येण्यासाठी तुम्ही मध्यरेल्वेच्या कर्जत या स्थानकावर उतरून तिथुन शेयरिंग ऑटो पकडून वदप या गावी उतरावे लागते. वदप व गौरकामत गावाच्या मागेच असलेल्या एक टेकडीवजा डोंगरावर हा किल्ला वसलेला असून दोन्ही गावातून किल्ल्यावर चढाई सुरू करू शकता. गडाचा घेरा मोठा नसला तरी गडावर १० – १२ पाण्याची टाके दिसून येतात. बालेकिल्ल्याच्या जागी काही बांधकामाचे अवशेष दिसून येतात. तसेच काही वास्तूंच्या जोत्याचे अवशेष सुद्धा दिसून येतात. गौरकामत या गावाच्या इथून गडावर चढाई करत असताना आपल्याना कातळकोरीव पायऱ्यांचा टप्पा लागतो. ह्या पायऱ्या अगदी लहान व काही ठिकाणी भग्न झाल्या आहेत. पावसा...