भिवगड – नव्याने परिचित होणारा एक अपरिचित किल्ला
मित्रांनो, तुम्ही बरोबर वाचलंय कारण ; भिवगड हा काही वर्षापूर्वी ट्रेकर्स व डोंगर भटक्यांच्या नजरेपासून अलिप्त राहिला होता. मुंबई पासून जवळ च असलेल्या या गडावर मात्र आता डोंगर भटके तसेच सह्यप्रेमींची पावले आता वळायला लागली आहे.
भिवगड हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वदप व गौरकामत या गावाच्यामध्ये एक टेकडीवजा किल्ला आहे. इथे येण्यासाठी तुम्ही मध्यरेल्वेच्या कर्जत या स्थानकावर उतरून तिथुन शेयरिंग ऑटो पकडून वदप या गावी उतरावे लागते. वदप व गौरकामत गावाच्या मागेच असलेल्या एक टेकडीवजा डोंगरावर हा किल्ला वसलेला असून दोन्ही गावातून किल्ल्यावर चढाई सुरू करू शकता.
गडाचा घेरा मोठा नसला तरी गडावर १० – १२ पाण्याची टाके दिसून येतात. बालेकिल्ल्याच्या जागी काही बांधकामाचे अवशेष दिसून येतात. तसेच काही वास्तूंच्या जोत्याचे अवशेष सुद्धा दिसून येतात. गौरकामत या गावाच्या इथून गडावर चढाई करत असताना आपल्याना कातळकोरीव पायऱ्यांचा टप्पा लागतो. ह्या पायऱ्या अगदी लहान व काही ठिकाणी भग्न झाल्या आहेत. पावसाळ्यात दगडी पायऱ्यांवर शेवाळ येत असल्याने या दिवसात थोडी काळजी घेऊनच हा कातळकोरीव पायऱ्यांचा टप्पा पार करावा.
मी, ऋत्विक, मंदार, वैभव व कर्तव्य असे पाच जण मिळून आम्ही भिवगड ला गौरकामत या गावातून किल्ल्यासाठी चढाई सुरू केली. माथ्यावर आल्यावर आम्हाला मागे भलामोठा ढाकचा किल्ला दृष्टीस पडला तसेच एका दिशेला संपूर्ण कर्जत चा परिसर व आजूबाजूची गावे दिसून येत होती. ऊन, वारा, पाऊस यांचा सुंदर खेळ अनुभवत आम्ही सुंदर आठवणी मनात साठवून गड उतरायला सुरुवात केली.
मुंबई-पुणे पासून जवळच असलेल्या कर्जत जवळील भिवगड या किल्ल्याला आपण एका दिवसात भेट देऊ शकता.ट्रेकर्समंडळी भिवगड (भीमगड) ते ढाक बहिरी असा रेंज ट्रेक देखील करतात. तर मित्रांनो भिवंगडासंबंधी माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला तुमच्या प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा.
अतिमहत्वाचे :- डोंगर दऱ्यांतून… रानवाटांमधून पावलांच्या ठश्यांशिवाय काहीही ठेऊ नका. साहसी सुखद आठवणींशिवाय काहीही सोबत नेऊ नका.
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
अधिक माहितीसाठी किल्ले भिवगड Vlog नक्की पहा
Nice
उत्तर द्याहटवाThank You 😊🙏
हटवाMast mahiti
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाNice, Excellent, Khup sundar Khup chan
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा