मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पवनी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पवनीच्या महास्तूपाचे अवशेष मुंबईकरांच्या भेटीला...

पवनी (अक्षांश २०° ४६' ४८" उत्तर, रेखांश ७९° ३७' ४८") हे शहर आजच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात असून नागपूरपासून ८२ किमी अंतरावर आग्नेयेस तर वैनगंगा नदीपासून ३ किमी अंतरावर नैऋत्य दिशेस स्थित आहे. पवनी हे प्राचीन काळापासून इथल्या तलम रेशीम कापडासाठी प्रसिद्ध असलेले शहर १९६८ मध्ये  अचानक एका वेगळ्याच गोष्टीसाठी प्रसिद्धीच्या झोतात आले त्याला कारण म्हणजे एका स्थानिक वृत्तपत्रातील बातमी ठरली. त्या बातमीचा मथळा असा की; जगन्नाथ टेकडीजवळ काही शिल्पे व ब्राम्ही लिपी उत्किर्ण असलेले स्तंभसदृष दगड सापडले आहेत. त्यानंतर; भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळ व नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने येथे भेट देण्यात आली व त्यांना इथे मोठ्या प्रमाणात बौद्ध शिल्पे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्याअगोदर हेन्री कझिंस यांनी प्राचीन पुरावशेषांची यादी १८९७ मध्येच पवनी हे महत्त्वाचे प्राचीन पुरावशेष शहर म्हणून सांगितलेले होते. १९६८ च्या भेटीनंतर येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन करणे आवश्यक आहे यावर विचार सुरू झाला. जागेचा विस्तार व तेथे उपलब्ध शिल्पकला यांचा विस्तार पाहता भा...