मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Khopoli लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Hal Khurd Caves | दुर्लक्षित हाळ खुर्द लेणी, खोपोली

हाळखुर्द बौद्ध लेणी सर्वप्रथम मी या पोस्ट च्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की; जे - जे प्रसिद्ध आहे; त्या वास्तू अथवा ठिकाणांना भेटी देण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. त्या स्थळांना वारंवार भेटी दिल्या जातात. परंतु; काही ठेवा असा देखील आहे, जो वर्षानुवर्षे आपल्या अस्तित्वाची लढाई या निसर्ग चक्रात एकटाच लढतो आहे. ऊन, वारा, पावसाच्या माऱ्यात शतकानुशतके कोणा वाटसरू अथवा पामराची वाट पाहत तिष्ठत उभा आहे. आपल्या मनीच्या गतकालीन वैभवाच्या गोष्टी ऐकण्यास जणू काही कोण तरी येईल आणि त्यास मी खुल्या मनाने, ओतप्रोत माहितीचा खजिना रिता करेन.... ! हेच तर त्या वास्तु बोलत नसतील ना ?? कधी हाकली आहे का त्यांची हाक ?? कधी साधला आहे का त्यांच्याशी संवाद ??.... मी ऐकलं आहे आज अशाच एका प्राचीन वास्तूची कथा...आज आम्ही इतकी माणसे त्या वास्तूवर एकत्र बघून ती वास्तू किती सुखावली असेल म्हणून सांगू...?मी तरी आज त्या वास्तूवर, तिच्या मनीच्या गुजगोष्टी ऐकून भारावलो. तिच्याशी मनातल्या मनात संवाद साधू लागलो. त्या वास्तूला एकेक प्रश्न विचारू लागलो, आणि ती वास्तूदेखील माझ्याशी बोलू लागली. तिच्या प्राचीन वैभ...