भिवगड – नव्याने परिचित होणारा एक अपरिचित किल्ला मित्रांनो, तुम्ही बरोबर वाचलंय कारण ; भिवगड हा काही वर्षापूर्वी ट्रेकर्स व डोंगर भटक्यांच्या नजरेपासून अलिप्त राहिला होता. मुंबई पासून जवळ च असलेल्या या गडावर मात्र आता डोंगर भटके तसेच सह्यप्रेमींची पावले आता वळायला लागली आहे. भिवगड हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वदप व गौरकामत या गावाच्यामध्ये एक टेकडीवजा किल्ला आहे. इथे येण्यासाठी तुम्ही मध्यरेल्वेच्या कर्जत या स्थानकावर उतरून तिथुन शेयरिंग ऑटो पकडून वदप या गावी उतरावे लागते. वदप व गौरकामत गावाच्या मागेच असलेल्या एक टेकडीवजा डोंगरावर हा किल्ला वसलेला असून दोन्ही गावातून किल्ल्यावर चढाई सुरू करू शकता. गडाचा घेरा मोठा नसला तरी गडावर १० – १२ पाण्याची टाके दिसून येतात. बालेकिल्ल्याच्या जागी काही बांधकामाचे अवशेष दिसून येतात. तसेच काही वास्तूंच्या जोत्याचे अवशेष सुद्धा दिसून येतात. गौरकामत या गावाच्या इथून गडावर चढाई करत असताना आपल्याना कातळकोरीव पायऱ्यांचा टप्पा लागतो. ह्या पायऱ्या अगदी लहान व काही ठिकाणी भग्न झाल्या आहेत. पावसा...
नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीत भटकंती करताना त्यातील गडकिल्ले, लेण्या यांचा माहितीपर प्रवासवर्णन तसेच मी भेटी दिलेल्या काही प्रसिद्ध ठिकाणे, पर्यटन स्थळांची माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे.