मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

karjat लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोंढाणे लेणी - कर्जत चा प्राचीन इतिहास सांगणारी ऐतिहासिक वास्तू

मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा सह्याद्रीने वेढलेला आहे. ह्या कर्जत मध्ये विविध गडकिल्ले, प्रेक्षणीय स्थळे आहेत. यांपैकी, कर्जत च्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूंपैकी सुमारे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील एक वास्तू म्हणजे किल्ले राजमाचीच्या पायथ्याशी असलेली कोंढाणे लेणी होय. कोंढाणे लेणी हि इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात कोरलेली असून ती बौद्ध धम्मातील स्थविरवाद या पंथाशी संबंधित असलेले शैलगृह आहे. ही लेणी मुंबईपासून पुण्याकडे जाणाऱ्या प्राचीन बोरघाट मार्गावर आहे. सोपारा बंदरातून कल्याणमार्गे पुढे देशावर विविध घाटमार्गाच्या साहाय्याने व्यापार होत असे. या व्यापारावर अंमल अथवा चौकी पहाऱ्यांचे ठिकाण म्हणून किल्ल्यांची निर्मिती झाली. तर अशाच प्राचीन बोरघाट (खंडाळा) मार्गावर किल्ले राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या कोंढाणे लेणीची सफर आपण आज करणार आहोत. कोंढाणे लेणी तशी आजच्या तारखेपर्यंत मी ४ ते ५ वेळा पहिली आहे. परंतु; मी जेव्हा पहिल्या वेळेस कोंढाणे लेणी ला भेट देण्यासाठी गेलो तेव्हा मी कसा गेलो ? लेणीवर काय पाहिलं ? लेणीची सद्यपरिस्थिती तसेच लेण...

भिवगड – नव्याने परिचित होणारा एक अपरिचित किल्ला

भिवगड – नव्याने परिचित होणारा एक अपरिचित किल्ला मित्रांनो, तुम्ही बरोबर वाचलंय कारण ; भिवगड हा काही वर्षापूर्वी ट्रेकर्स व डोंगर भटक्यांच्या नजरेपासून अलिप्त राहिला होता. मुंबई पासून जवळ च असलेल्या या गडावर मात्र आता डोंगर भटके तसेच सह्यप्रेमींची पावले आता वळायला लागली आहे. भिवगड हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वदप व गौरकामत या गावाच्यामध्ये एक टेकडीवजा किल्ला आहे. इथे येण्यासाठी तुम्ही मध्यरेल्वेच्या कर्जत या स्थानकावर उतरून तिथुन शेयरिंग ऑटो पकडून वदप या गावी उतरावे लागते. वदप व गौरकामत गावाच्या मागेच असलेल्या एक टेकडीवजा डोंगरावर हा किल्ला वसलेला असून दोन्ही गावातून किल्ल्यावर चढाई सुरू करू शकता. गडाचा घेरा मोठा नसला तरी गडावर १० – १२ पाण्याची टाके दिसून येतात. बालेकिल्ल्याच्या जागी काही बांधकामाचे अवशेष दिसून येतात. तसेच काही वास्तूंच्या जोत्याचे अवशेष सुद्धा दिसून येतात. गौरकामत या गावाच्या इथून गडावर चढाई करत असताना आपल्याना कातळकोरीव पायऱ्यांचा टप्पा लागतो. ह्या पायऱ्या अगदी लहान व काही ठिकाणी भग्न झाल्या आहेत. पावसा...