आजचे कल्याण हे प्राचीन काळी अत्यंत महत्वाचे बंदर होते. कल्याणचा उल्लेख कान्हेरी लेणीमध्ये कलीयान, कलीअण, कल्याण अशा अनुषंगाने तब्बल नऊ वेळा आला आहे. हे सर्व शिलालेख इ.स. च्या पहिल्या, दुसऱ्या, पाचव्या तसेच सहाव्या शतकात कोरण्यात आलेले आहे. यांपैकी, दोन शिलालेखात कल्याण येथील अंबालिका बौद्ध विहाराचा दान दिल्याचा उल्लेख आला आहे. हे कल्याण उल्हासनदीच्या खाडीकिनारी वसलेले असून इथे मलंगगड, ताहुली यांसारखे शिखरे असून, १७ व्या शतकात ऑक्टोबर १६५४ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण वर स्वारी करून सदर प्रदेश स्वराज्यात आणला. तसेच, कल्याण खाडीकिनारी दुर्गाडी किल्ल्याची उभारणी करून मराठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. तसेच, लोनाड येथील इ.स. ६ व्या शतकातील बुद्ध लेणी, तसेच लोनाड गावातील इ.स. ११ व्या शतकातील लवणादित्य मंदिर अशी काही प्राचीन पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. अशा या कल्याण चा इतिहास सांगू तेवढा कमीच आहे. लोनाड गावातील चौधरपाडा येथील शिवपार्वती मंदिर आज आपण सदर ब्लॉग च्या माध्यमातून कल्याण येथील लोनाड गावातील चौधरपाडा येथील इ.स. १३ व्या शतकातील एका शिलालेखाची माहिती जाऊन घेणार...
नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीत भटकंती करताना त्यातील गडकिल्ले, लेण्या यांचा माहितीपर प्रवासवर्णन तसेच मी भेटी दिलेल्या काही प्रसिद्ध ठिकाणे, पर्यटन स्थळांची माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे.