मुख्य सामग्रीवर वगळा

कल्याण येथील लोनाड गावातील चौधरपाडा येथील केशिदेव द्वितीय याचा शिलालेख

आजचे कल्याण हे प्राचीन काळी अत्यंत महत्वाचे बंदर होते. कल्याणचा उल्लेख कान्हेरी लेणीमध्ये कलीयान, कलीअण, कल्याण अशा अनुषंगाने तब्बल नऊ वेळा आला आहे. हे सर्व शिलालेख इ.स. च्या पहिल्या, दुसऱ्या, पाचव्या तसेच सहाव्या शतकात कोरण्यात आलेले आहे. यांपैकी, दोन शिलालेखात कल्याण येथील अंबालिका बौद्ध विहाराचा दान दिल्याचा उल्लेख आला आहे. हे कल्याण उल्हासनदीच्या खाडीकिनारी वसलेले असून इथे मलंगगड, ताहुली यांसारखे शिखरे असून, १७ व्या शतकात ऑक्टोबर १६५४ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण वर स्वारी करून सदर प्रदेश स्वराज्यात आणला. तसेच, कल्याण खाडीकिनारी दुर्गाडी किल्ल्याची उभारणी करून मराठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. तसेच, लोनाड येथील इ.स. ६ व्या शतकातील बुद्ध लेणी, तसेच लोनाड गावातील इ.स. ११ व्या शतकातील लवणादित्य मंदिर अशी काही प्राचीन पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. अशा या कल्याण चा इतिहास सांगू तेवढा कमीच आहे. 

लोनाड गावातील चौधरपाडा येथील शिवपार्वती मंदिर

आज आपण सदर ब्लॉग च्या माध्यमातून कल्याण येथील लोनाड गावातील चौधरपाडा येथील इ.स. १३ व्या शतकातील एका शिलालेखाची माहिती जाऊन घेणार आहोत. हा शिलालेख लोनाड गावातील चौधरपाडा येथे १८८२ मध्ये सापडला. हा शिलालेख सध्या लोनाड गावातून आत आल्यावर चौधरपाडा येथील शिवपार्वती मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतींमध्ये लोखंडी सळई च्या ग्रील्स मध्ये संरक्षित करून ठेवला आहे तसेच, तो सर्व इतिहास अभ्यासक व पर्यटकांना सहज पाहता येतो. शिलालेख १८७.९६ सेमी उंच, ४३.१८ सेमी रुंद व २६.४० सेमी जाड आहे. शिलालेखाच्या अग्रभागी सूर्य, चंद्र व मंगलकलशाच्या आकृती कोरण्यात आलेल्या असून खाली गदर्भशापाचे शिल्प आहे. हा शिलालेख दानपत्राच्या रुपात असून शिलाहार राजा द्वितीय केशिदेव याने शके सवंत ११६१ विकारी संवत्सर, माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री, मंगळवारी म्हणजेच २४ जानेवारी १२४० रोजी घोषित केले. हा शिलालेख संस्कृत भाषेत कोरला असून त्याची लिपी देवनागरी आहे.

या शिललेखाचे संपूर्ण विवेचन खालीलप्रमाणे आहे.

ज्या शिळेवर शिलालेख आहे ती शिळा

संस्कृत शिलालेख

१) सिध्दम् औं नमो विनायकाय || नमामि भुजनोत्पत्तिस्थितिसंहारकारिणं ( णम् ) । श्रीमत्युपेस्व ( श्व) -

२) रं भक्तजन सर्वार्तिहारिणं ( णम् ) ॥१॥ श्रीविद्याधरवंशमडनमणिर्जीमूतकेतो : कु- 

३) ले विख्यातोस्त्यपरार्कराजतनय (यः) श्रीकेशिपृथ्वीपतिः । यस्यापारपवित्र-

४) पौरुपनिधेरालोक्य राज्यस्थिति श्रीरामादिमहीभुजां भगवती धत्ते.. 

५) धरा न स्मृति (तिम्) ॥२॥ स (श) कसंवत् १९६१ विकारिसंवत्सरांतर्गत माघ व दि १४

६) चतुद्दश्या भौमे शिवारात्रौ पर्व्वणि अद्येह समस्तराजावलीसमलंकृ-

७) तमहाराजाधिराजकोकणचक्रवर्ति श्रीके शिवदेवकल्याणवि -

८) जयराज्ये तथैतत्प्रसादात्समस्तराज्यमंडलचिता भारं समुद्वहति 

९) महामात्ये श्रीझंपडप्रभु महासधिविग्र (हि) कराजदेव पंडित श्री

१०) करणा भांडागारे अनंतप्रभु प्रभु (खे) पु सत्सु एतस्मिस्कापे प्रवर्तमाने

११) सति ब्रम्हपुरीग्रामदानसा (शा) समं समधिलिक्ष (ख्य) ते यथा ॥ श्रीषुपेश्वर

१२) रदेव प्जनसदाव्यासक्तसर्वा (स्तरः) । सत्पात्रद्विजसोमनायक 

१३) व (ब) संतानयो (भो) ग्यस्थितिं (तिम्) | श्रीबंम्हपुरी पुरारिभवनक्ष्माभृन्मनोहा

१४) रिणीं । वीरः कारयति स्म विस्मयमयीं श्रीकेशिपृथ्वीपति. ||३|| बटुक-

१५) नामानि कथ्यते । सोमनायकः सूर्य्यनायकः । गोविंदनायक । नाऊ ।

१६) नायक: । इति चत्वारो बट (टु) का: ।। निर्व्वाहाय पुरारिपूजकबटु श्रेणीद्वि- 

१७) जाना सदा वो (वो) पग्रामगता स्वसीमसहिता मां (जे?) सपल्लीपुरा दत्ता श्रीशि

१८) विरात्रिपर्व्वणि विभोः षोपेस्व ( श्व) रस्याग्रतः श्रीमत्केशिनरेश्वरेण विमला चं-

१९) पार्कतारावधि ॥४॥ (राज्य)स्य मंत्रिणान्यैर्व्वा कर्त्तव्यं धर्म्मपालन ( नम्) । धर्म- 

२०) ध्वंशे..... ... नरकस्थिति (तिः) ॥५॥ तथा चोक्तं पूर्वाचार्य्यमुनि-

२१) भिः सुवर्णमेक गामेका भुमेरप्येक मंगुलं (लम्) । हरन्नरकमाप्नोति या -

२२) ( वदाभत) संप्लवं (वम् ) ॥६॥ मंगल महाश्री: 1 (शुभं भ) क्तु ॥ ले (ख) कपाठकयो


मराठी भाषांतर 

(१) सिध्दी असो विनायकास नमस्कार असो । विश्वाची उत्पत्ती, संधारण व लय यास कारणीभूत असलेला व भक्तजनांचे दुःख हरण करणाऱ्या श्रीमत् षुपेश्वरास नमस्कार असो .||१| श्री विद्याधर वंशाचा भूषणभूत जीमूतकेतुच्या कुळात प्रसिध्द असलेल्या राजा अपराकांचा पुत्र पृथ्वीपती केशीदेव ज्याचे पावित्र्य अपार व अवर्णनीय आहे व ज्याच्या पौरुषत्त्वाचा संचय अवलोकन करण्यासारखा आहे व ज्याच्या राज्याची समृध्दी, श्रीराम आदी पराक्रमी राजांची पृथ्वीदेवतेला स्मरण करुन देणारी आहे ॥ २॥ शक संवत ११६१ विकारी संवत्सर, माघ कृष्ण चतुर्दशी, शिवरात्री मंगळवार या दिवशी संपूर्ण राजमंडळाने सुशोभित असलेला महाराजधिराज कोकणचक्रवर्ती श्रीकेशीदेव ज्याचे राज्य पराक्रमी व कल्याणदायी आहे, अत्यंत प्रसन्न होऊन संपूर्ण राजमंडळाची जो चिंता वाहतो महा अमात्य श्री झपडप्रभु, महासंधिविग्रहक राजदेव पंडित व कोषाध्यक्ष अनंतप्रभ हे ज्याचे प्रमुख मंत्री आहेत त्या बम्हपुरी (चौधरपाडा) गावात हे आज्ञापत्र या काळात लिहिले गेले ते असे ।। श्रीषुपे श्वरदेवाच्या पूजेअर्चेत सतत रममाण असलेला योग्य सत्पात्र ब्राम्हण सोमनायक यास त्याच्या मुलाबाळांच्या देखभालीसाठी पुरातन काळात शिवाच्या वास्तव्यास योग्य असलेल्या मनोधरिणी ब्रम्हपुरी, जेथे शूर केशिदेव पृथ्वी विस्मयकारक गोष्टी करण्यात अग्रेसर असे ||३|| सोमनायक सूर्यनायक, गोविंदनायक व नाऊ नायक या चार बटुंची नावे सागितली आहेत त्या शिवाची पुजा करणाऱ्या बटुक थोर श्रेणी ब्राम्हण बापगावातील त्याच्या निर्वाहासाठी सर्व सिमाअंतर्गत मांजसपल्ली (वाडी) श्रीकेशिनरेश्वराने परमात्मा षुपेश्वरासमोर यावत् चंद्र दिवाकरौ - स्वच्छ चादण्या रात्री शिवरात्री ) दान दिला ॥४॥ राजमंत्र्यांना या राजपत्राचे पालन करणे हे धर्मपालनासारखे आहे असे मानले पाहिजे. तसे न केल्यास ती नरकरिस्थती ठरेल ॥५॥ ऐँखादे सोन्याचे नाणे, एक गाय, पृथ्वीवरील भूमीचे दान केलेले असले व जो परत हरण करतो किवा ते घेण्याची पुन्हा इच्छा करतो त्याला निरंतर नरक प्राप्त होतो असे पूर्वी मुनी - आचार्यांनी सांगून ठेवले आहे ॥६॥ श्रेष्ठाचे (वडिलधाऱ्या) कल्याण असो लेखक व वाचक यांचेही शुभ होवो ॥


संदर्भ :- ठाणे जिल्हा गॅझेटियर
चौधरपाडा येथील शिवपार्वती मंदिराजवळ असलेला माहितीफलक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी व शिलालेख... किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला आंबिवली बौद्ध लेणी वाचकमित्रांनो, मी रोहित भोसले माझ्या ब्लॉग वर तुमचे सहर्ष स्वागत करतो आहे. काल दिनांक ०३ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला भेटीचा योग आला. यापूर्वी दोन वेगवेगळ्या मित्रांसोबत कोथळीगड पाहून झाला आहे. परंतु, जॉनी व अनंता ( जे आजच्या भेटीत सोबत होते ) यांनी कोथळीगड पाहण्याची इच्छा व्यक्त केली मग लागलीच आम्ही कोथळीगड भेटीस निघालो.   कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आंबिवली गावाजवळ आहे. कर्जत स्थानकापासून किल्ल्याच्या पायथ्याचे अंतर हे सुमारे २९ किमी असून तर नेरळपासून २७ किमी इतके आहे. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून कुसुर घाटमार्गाने मालवाहतूक घाटावरच्या गावाशी जोडलेल्या ह्या घाटमार्गाने होत होती. यामुळे, या घाटमार्गावर चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तेवढ्याच बळकट संरक्षक दुर्गांची निर्मिती झाली. त्यातील च एक आकाराने लहान तरीही महत्वपूर्ण असा कोथळीगड उर्फ पेठच्...

खोपोली येथील KP Waterfall अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा

दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी खोपोली येथील KP WATERFALLS अर्थात खंडाळा पॉईंट धबधबा येथे भेट दिली. हा धबधबा मुळात लोणावळा - कल्याण रेल्वे मार्गावरील मुंबई अप viaduct -6 येथे स्थित आहे. याचे स्थान इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वेस्थानक येथे उतरावे लागते. खोपोली रेल्वे स्थानक येथे उतरले असता संपूर्ण बोरघाटाची डोंगररांग आपल्या दृष्टीस पडते. या स्थानकावरून काहीसे पूर्वोत्तर पाहिले असता डोंगरावर एक ब्रीज गेलेला दिसून येतो. हाच आहे तो वर उल्लेख केलेला पुणे - कल्याण रेल्वे Viaduct आणि नेमके येथेच आपल्याला जायचे आहे. या सफरीसाठी मी रोहित रा. भोसले व प्रफुल्ल पुरळकर असेच दोघे होतो. मध्य रेल्वेच्या खोपोली स्थानकावरून पूर्वेला बाहेर पडत आपण झेनिथ धबधबा येथे जाण्यासाठी रिक्षा करावी किंवा अंतर जवळच असल्याने पायी - पायी पण रमत गमत हे अंतर पार करता येईल. आम्ही खोपोली येथे उतरल्यावर हे अंतर रमत गमत पायी कापायचे असे ठरवले. येथील धबधबे हे केवळ पावसाळी असल्याने या दिवसात या धबधब्याची सफर केलात तेही आठवड्याच्या शनिवार, र...