मुख्य सामग्रीवर वगळा

चक्रवर्ती सम्राट अशोक यांची संबोधी स्थळास भेट


चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी राजाभिषेकानंतर दहाव्या वर्षी संबोधी (बोधगया) यात्रा केली होती, अशी नोंद सम्राटांनी कोरविलेल्या गिरनार येथील आठव्या शिलालेखात आहे. हा कालखंड अंदाजे ख्रिस्तपूर्व २६० मधील असावा. ज्या ठिकाणी सिद्धार्थ गोतम यांना संबोधी प्राप्त झाली, त्याठिकाणी बुध्दांच्या स्मरणार्थ महत्त्वाची विशेष वास्तू उभारावी या हेतूने सम्राट अशोक यांनी एका रत्नजडित वज्रासनाची स्थापना केली. यामागे त्यांचा हेतू मूळ संबोधी स्थळाची नेमकी जागा लोकांना कळून यावी हा होता. आज संबोधी स्थळ जे काही भव्यदिव्य दिसते त्याची वीट पहिल्यांदा रचणारे हे सम्राट अशोक होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या प्रसंगावर आधारित शिल्प सांची, भरहुत स्तूपाबरोबरच खालील जोडलेले जे चित्र आहे अशा सन्नती येथील भग्न स्तूपाच्या अवशेषावर देखील शिल्पांकित आहे. सदर चित्रात एक बोधिवृक्ष असून त्याखाली एक रिक्त आसन (वज्रासन) दिसून येते आहे. आसनाच्या खाली पादपिठावर धम्मचक्र वलयांकित बुद्धांचे धम्मकाया स्वरूपातील पदचिन्ह शिल्पित आहे. या वज्रासनास सहृदय वंदन करताना तसेच बोधिवृक्षास कमलपुष्प अर्पण करताना सम्राट अशोक दिसत आहे. होय. हे शिल्प सम्राट अशोक यांचेच आहे. कारण; त्यांची ओळख सिद्ध करणारा शिलालेख खालील वेदिका पट्टीवर राया असोको असा नमूद आहे. इथे एक बाब ध्यानात आणून द्यावीशी वाटते की; दोन्ही बाजूकडील पुरुष शिल्प हे सम्राट अशोक यांचेच आहे. होय. कारण; ज्या ठिकाणी सिद्धार्थ गोतम यांना संबोधी प्राप्त झाली अशा मूळ बोधिवृक्षास वंदन करतेवेळी मनगटातील कडे सोडता सम्राट अशोक यांनी गळ्यात किंवा बाहुंमध्ये कोणत्याही प्रकारचे राजालंकार परिधान केलेले नसावेत, याचे कारण बोधीवृक्षास वंदन करतेवेळी ते सामान्य उपासकांप्रमाणे नतमस्तक झाले असण्याची दाट शक्यता आहे. खालील चित्रात डाव्याबाजूला अगदी हेच शिल्पांकन दिसून येते. ते असे की; "बोधिवृक्षास वंदन करताना सम्राट अशोकांच्या अंगावर कडे सोडले असता कोणतेही अलंकार दिसून येत नाही. याठिकाणी; मागील बाजूस स्त्री शिल्प हातात परडी घेऊन दिसून येते." याऊलट चित्रात उजव्या बाजूस दर्शविल्याप्रमाणे; "बोधिवृक्षाखाली स्वहस्ते स्थापन केलेल्या वज्रासनास वंदन करतेवेळी मात्र त्यांच्या सर्वांगावर राजालंकार ल्यालेले दिसून येत आहे. याठिकाणी; मागील बाजूस स्त्री शिल्प हातात देठासहित कमलपुष्प घेऊन दिसून येत आहे." मूळ बोधिवृक्षास व त्याखाली स्व-स्थापित वज्रासनास वंदन अशा दोन घटनांचे शिल्पांकन करतेवेळी सम्राट अशोकांच्या प्रत्यक्ष भौतिक शरीरावरील या फरकाचे शिल्पकाराने शिल्पाच्या स्वरूपातून शिल्पित केलेले शिल्पांकन सम्राट अशोक या दोन घटनांना अशाच प्रकारे सामोरे गेले असतील यावर शिक्कामोर्तब करते, अशी माझी दृढ खात्री आहे. शिल्पकाराने शिल्प घडवताना दर्शविलेला हा भेद माझ्या नजरेत शिल्प समजून घेत असताना आला. तो मी सदर लघु लेखातून आपणासमोर मांडला आहे. 

या शिल्पावर आपले निरीक्षण काय ? हे नोंदवायला विसरू नका. 

#चला_समजून_घेऊ_शिल्पांची_भाषा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...