'वीरगळ' म्हणजे युद्धात किंवा कोणत्याही संग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या शूर योद्धेय सैनिकाच्या स्मरणार्थ उभारलेला कोरीव दगडी पाषाणस्तंभ होय. यावर, सहसा वीर पुरुषाची आकृती, त्यांची शस्त्रे, आणि कधीकधी त्यांना स्वर्गात नेणारे अप्सरा किंवा देवदूत यांचे शिल्पांकन असते. कानडी भाषेत ' कल्लू ' म्हणजे दगड ' वीरकल्लू ' म्हणजे वीराचा दगड यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द या वीर योद्ध्यांच्या स्मरणार्थ शिळेला प्रचलित झाला असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. थोडक्यात वीरगळमध्ये युद्धात धारातीर्थी पडलेल्या पुरुषाचे स्मरण असते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सहसा देवळांजवळ किंवा शेतात आढळणारे हे या स्मारकशिळा इतिहासाच्या मूक साक्षीदार आहेत, विरगळाच्या निर्मितीकाळाचा उगम साधारणपणे शिलाहार काळापर्यंत मागे जातो. महाराष्ट्रातही शिवकाळापूर्वी आणि काळातील अनेक गावांत हे वीरगळ गावाचे रक्षण करताना प्राण अर्पण केलेल्या योद्ध्यांची आठवण म्हणून उभे आहेत. हे केवळ मूक दगड नसून ते तत्कालीन युद्धकला, शस्त्रे, पोषाख आणि तत्कालीन सामाजिक जीवनाची माहिती देतात. गावागावांत शेंदूर फासून पूजले जाणारे ह...
नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीत भटकंती करताना त्यातील गडकिल्ले, लेण्या यांचा माहितीपर प्रवासवर्णन तसेच मी भेटी दिलेल्या काही प्रसिद्ध ठिकाणे, पर्यटन स्थळांची माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे.