मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुंबईतील वसाहतकालीन भूतकाळाचे अवशेष...

मुंबईतील वसाहतकालीन भूतकाळाचे अवशेष... सदर चित्रात दिसणारा विशिष्ट मैलाचा दगड असून तो मुंबईतील दादर पूर्व येथे दादासाहेब फाळके रोडवर उभा आहे. या दगडावर इंग्रजी लॅटिन अक्षरे तसेच रोमन अंकात VI Miles from St. Thomass Church असे लिहिलेले आहे. हे दगड मूळतः फोर्ट परिसरातील ३०० वर्षे जुन्या सेंट थॉमस चर्चपासूनचे अंतर दर्शवण्यासाठी वापरले जात होते. हे चर्च १८ व्या शतकात मुंबई शहराचे भौगोलिक केंद्र मानले जात होते. त्यांपैकी; उपरोक्त चर्चपासून ते सध्या जिथे उभा आहे अशा दादर पूर्व दादासाहेब फाळके मार्गावरील साधना हॉटेल येथील चौकपर्यंतचे सहा मैलाचे अंतर दर्शवणारा हा दगड मुंबईच्या श्रेणी १ वारसा वास्तू म्हणून नोंद आहे. Remnants of Mumbai's colonial past...  The specific milestone seen in this image stands on Dadasaheb Phalke Road in Dadar East, Mumbai. Inscribed on the stone in English (Latin script) and Roman numerals is the text: "VI Miles from St. Thomas's Church." These stones were originally used to indicate the distance from the 300-year-old St. Thomas's Chu...

तथागत गौतम बुद्धांचे भिक्षापात्र...

तथागत गौतम बुद्धांचे भिक्षापात्र... थेरवाद परंपरेत बुद्धांना धम्मकाया (प्रतिकांच्या) स्वरूपात पुजले जात होते. बुद्धांचा सिंहनाद (धम्मचक्र प्रवर्तन ) निनादल्यापासून बुद्धांची मूर्ती मानवीय स्वरूपात प्रत्यक्षात येईपर्यंत सुमारे ५०० ते ५५० वर्षांचा काळ लोटला. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रत्यक्ष प्रतिमेच्या स्वरूपापेक्षा बुद्धांचे प्रतिनिधीत्व दर्शविण्यासाठी प्रतीकांचा शोध सुरू झाला.साहजिकच बुद्धांच्या जीवनाशी संबंधित वस्तू अथवा घटनांचे स्मरण देणाऱ्या वस्तू प्रतीके म्हणून स्वीकारली गेली. यांमध्ये स्तूप, पांढरा हत्ती, कमळ, घोडा, बोधिवृक्ष, गंधकुटी, वज्रासन, धम्मचक्र, बुद्धपाद (पदचिन्ह) व त्रिरत्न ई. होय. तर वरील सर्व धम्मकाया प्रतीकांपैकी तथागथांचे भिक्षापात्र याविषयी माहिती जाणून घेऊया. आजच्या बिहार राज्यातील गंगा नदीच्या उत्तरेस वसाढ नावाचे खेडे म्हणजेच प्राचीन काळाची राजनगरी वैशाली होय.सध्याचे बिहारमधील वसाढ हेच प्राचीन काळातील वैशाली हे भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक अलेक्झांडर कनिंगहम यांनी प्रथमतः सर्वांसमक्ष आणले. तथागतांच्या हयातीत वैशालीस लिच्छवी राजघराणे राज्य कर...

कोंढाणे लेणीच्या विष्णुशास्त्री यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पहिल्या नोंदीचा मजकूर...

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्राचीनकाळाशी नाळ जोडलेली वास्तू म्हणजे किल्ले राजमाचीच्या पायथ्याशी असलेली अंदाजे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील कोंढाणे लेणी होय. या लेणीसंबंधीत विविध अंगाने, पोस्ट - लेख तसेच अभ्यास दौऱ्यांच्या सहाय्याने मी आपणास यापूर्वी माहिती देत आलेलो आहेच. त्याचप्रमाणे आजदेखील कोंढाणे लेणीसंबंधीची एक जुनी नोंद आपल्यासाठी या पोस्टच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोतच की; ज्ञात जगताला कोंढाणे लेणीची प्रथम ओळख ही विष्णुशास्त्री यांनी करून दिली. तर त्या घटनेची नेमकी जुनी नोंद खालीलप्रमाणे: मे १८४९ मध्ये पुण्याच्या प्रवासावर असताना, डॉ. विल्सन यांची 'खालापूर' येथे विष्णूशास्त्री यांच्याशी भेट झाली; त्यावेळी विष्णूशास्त्री हे त्या जिल्ह्याचा कारभार पाहत होते. डॉ. विल्सन यांनी विष्णूशास्त्री यांना विनंती केली की, जांब्रुग येथील गुंफांच्या (कोरीव कामांच्या) तपासणीसाठी त्यांनी एखाद्या विश्वासू व्यक्तीला तिथे पाठवावे. यादरम्यान राजमाची टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या या कोंढाणे लेणीचा शोध, वर नमूद केलेल्या परिस्थितीमध्ये जांब्रुग येथे...