मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

gautama buddhā लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तथागत गौतम बुद्धांचे भिक्षापात्र...

तथागत गौतम बुद्धांचे भिक्षापात्र... थेरवाद परंपरेत बुद्धांना धम्मकाया (प्रतिकांच्या) स्वरूपात पुजले जात होते. बुद्धांचा सिंहनाद (धम्मचक्र प्रवर्तन ) निनादल्यापासून बुद्धांची मूर्ती मानवीय स्वरूपात प्रत्यक्षात येईपर्यंत सुमारे ५०० ते ५५० वर्षांचा काळ लोटला. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रत्यक्ष प्रतिमेच्या स्वरूपापेक्षा बुद्धांचे प्रतिनिधीत्व दर्शविण्यासाठी प्रतीकांचा शोध सुरू झाला.साहजिकच बुद्धांच्या जीवनाशी संबंधित वस्तू अथवा घटनांचे स्मरण देणाऱ्या वस्तू प्रतीके म्हणून स्वीकारली गेली. यांमध्ये स्तूप, पांढरा हत्ती, कमळ, घोडा, बोधिवृक्ष, गंधकुटी, वज्रासन, धम्मचक्र, बुद्धपाद (पदचिन्ह) व त्रिरत्न ई. होय. तर वरील सर्व धम्मकाया प्रतीकांपैकी तथागथांचे भिक्षापात्र याविषयी माहिती जाणून घेऊया. आजच्या बिहार राज्यातील गंगा नदीच्या उत्तरेस वसाढ नावाचे खेडे म्हणजेच प्राचीन काळाची राजनगरी वैशाली होय.सध्याचे बिहारमधील वसाढ हेच प्राचीन काळातील वैशाली हे भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक अलेक्झांडर कनिंगहम यांनी प्रथमतः सर्वांसमक्ष आणले. तथागतांच्या हयातीत वैशालीस लिच्छवी राजघराणे राज्य कर...