मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

kondane caves लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोंढाणे लेणीच्या विष्णुशास्त्री यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पहिल्या नोंदीचा मजकूर...

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्राचीनकाळाशी नाळ जोडलेली वास्तू म्हणजे किल्ले राजमाचीच्या पायथ्याशी असलेली अंदाजे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील कोंढाणे लेणी होय. या लेणीसंबंधीत विविध अंगाने, पोस्ट - लेख तसेच अभ्यास दौऱ्यांच्या सहाय्याने मी आपणास यापूर्वी माहिती देत आलेलो आहेच. त्याचप्रमाणे आजदेखील कोंढाणे लेणीसंबंधीची एक जुनी नोंद आपल्यासाठी या पोस्टच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोतच की; ज्ञात जगताला कोंढाणे लेणीची प्रथम ओळख ही विष्णुशास्त्री यांनी करून दिली. तर त्या घटनेची नेमकी जुनी नोंद खालीलप्रमाणे: मे १८४९ मध्ये पुण्याच्या प्रवासावर असताना, डॉ. विल्सन यांची 'खालापूर' येथे विष्णूशास्त्री यांच्याशी भेट झाली; त्यावेळी विष्णूशास्त्री हे त्या जिल्ह्याचा कारभार पाहत होते. डॉ. विल्सन यांनी विष्णूशास्त्री यांना विनंती केली की, जांब्रुग येथील गुंफांच्या (कोरीव कामांच्या) तपासणीसाठी त्यांनी एखाद्या विश्वासू व्यक्तीला तिथे पाठवावे. यादरम्यान राजमाची टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या या कोंढाणे लेणीचा शोध, वर नमूद केलेल्या परिस्थितीमध्ये जांब्रुग येथे...