मुख्य सामग्रीवर वगळा

कोंढाणे लेणीच्या विष्णुशास्त्री यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पहिल्या नोंदीचा मजकूर...

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्राचीनकाळाशी नाळ जोडलेली वास्तू म्हणजे किल्ले राजमाचीच्या पायथ्याशी असलेली अंदाजे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील कोंढाणे लेणी होय. या लेणीसंबंधीत विविध अंगाने, पोस्ट - लेख तसेच अभ्यास दौऱ्यांच्या सहाय्याने मी आपणास यापूर्वी माहिती देत आलेलो आहेच. त्याचप्रमाणे आजदेखील कोंढाणे लेणीसंबंधीची एक जुनी नोंद आपल्यासाठी या पोस्टच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोतच की; ज्ञात जगताला कोंढाणे लेणीची प्रथम ओळख ही विष्णुशास्त्री यांनी करून दिली. तर त्या घटनेची नेमकी जुनी नोंद खालीलप्रमाणे:
मे १८४९ मध्ये पुण्याच्या प्रवासावर असताना, डॉ. विल्सन यांची 'खालापूर' येथे विष्णूशास्त्री यांच्याशी भेट झाली; त्यावेळी विष्णूशास्त्री हे त्या जिल्ह्याचा कारभार पाहत होते. डॉ. विल्सन यांनी विष्णूशास्त्री यांना विनंती केली की, जांब्रुग येथील गुंफांच्या (कोरीव कामांच्या) तपासणीसाठी त्यांनी एखाद्या विश्वासू व्यक्तीला तिथे पाठवावे. यादरम्यान राजमाची टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या या कोंढाणे लेणीचा शोध, वर नमूद केलेल्या परिस्थितीमध्ये जांब्रुग येथे डॉ. विल्सन यांच्या सांगण्यावरून विष्णूशास्त्री यांच्यामार्फत पाठवण्यात आलेल्या दूताने लावला. त्यावेळी विष्णूशास्त्री यांनी डॉ. विल्सन यांना या गुंफांविषयी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे - "कोंडाणे गावाजवळ लेणें फार चांगले आहे. तेथील मुख्य ठिकाणी आत जाण्याचा मोठा दरवाजा आहे, आणि त्याला लाकडाची कमान आहे. आत बुद्धांचे देव-स्थानाचा वाटोळा घुमट आहे, आणि तो मुख्य सभामंडप वेहेरचे सभामंडपासारखा उंच आहे; व दरवाजाचे बाजुस बुद्धांच्या मूर्ती आहेत, आणि त्या मूर्तीचे वरचे बा-जूस एक ओळ अक्षरांची कोरलेली आहे, तिला अकरा किंवा बारा अक्षरें फार चांगली आहेत, याखेरीज अधीक अक्षरें लिहिलेली नाहींत. मुख्य सभामंडपाचे शेजारी दुसरा सभामंडप लाहान आहे. मिळोन दोन ठिकाणें फार चांगलीं आहेत. मुख्य सभामंडपाचे खांब मुसलमान लोकांचा कल्याणांस अमल होता तेव्हां त्यांणी खालून तोडिले आ-हेत असें तर्काने दिसतें. हे ठिकाण खालापुरापासून पांच कोश लांब आहे. डोंग-रास चढाव बराच आहे. खोपवलीपासून जवळ आहे, परंतु रस्ता फार अवघड आहे. यास्तव जाणे झाल्यास चांगल्या रस्त्यानें जावें ह्मणजे पालखीत बसून जातां येईल. पुढे ज्या ठिकाणी फार चढाव आहे तेथे घोड्यावर बसून गेले पाहिजे. याप्रमाणे कोंडा-ण्यांचे लेण्यांचा मजकूर आहे."

संदर्भ : ज.बॉ.ब्रा.रॉ.ए.सो.,१८५०
कृष्णधवल छायाचित्राचे श्रेय : १८८० मध्ये हेन्री कझन्स यांनी काढलेले.

One of the most ancient structures in the history of Karjat taluka, Raigad District is the Kondhane Caves at the base of Rajmachi fort, dating back to approximately second century BCE. I have already told you about these caves through various sources, post-articles and study tours. Similarly, we have brought an old record of Kondhane Caves for you through this post. We have heard so far that Vishnushastri was the first to introduce the Kondhane caves to the known world. So, the exact historical record of that incident is as below:
While on a visit to Pune in May 1849, Dr. Wilson met Vishnushastri at Khalapur when the latter was in charge of the district. Dr. Wilson requested Vishnushastri to send a trusted person to inspect the caves (carvings) at Jambrung. Meanwhile, this Kondhane cave situated at the foot of the Rajmachi hill was discovered by an emissary sent by Vishnushastri to Jambrung under the circumstances mentioned above. At that time, the information provided by Vishnushastri to Dr. Wilson regarding these caves was as follows: "There is a very excellent excavation near the village of Kondóná. There is a large gateway forming the entrance to the principal apart-ment; and it has a wooden arch. Within, there is a circular dome of a Buddhist temple; and this, the chief assembly hall, is lofty like that at Veher (near Kárlá). There are images of Buddh at the side of the gateway; and above these images there is an inscription of eleven or twelve letters well formed, but there is no other inscription. There is a second small assembly hall near the chief one. Both the places are important. There are grounds for supposing that the injury which has been sustained by the pillars of the principal assembly hall, was caused by the Musalmans when they were in authority at Kalyán. The place [of the caves] is five kos distant from Khálápur. There is a considerable ascent. It is near Khopawali [at the foot of the Bhor Ghát]; but the road is very difficult. If you wish to go to it, the good road must be taken. You will nearly reach it in a pálkhí. Where the ascent is great, you must have a horse. So much for the excava-tion at Kondáná."

Refrance : JBBRAS,1850
B/W Pic Credit : Photographed by Henry Cousens in 1880.

संकलन: ✍️ रोहित रा. भोसले





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राचीनकाळाची Candid Photography...

आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...? हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की...

मैत्री - प्रथम व अंतिम मानव धर्म

मानवी इतिहासातील नागरिकीकरणाचे उपलब्ध पुराव्याआधारे असे मानले जाते की, मानव धर्माची (मैत्री) स्थापना खऱ्या अर्थाने सिंधू - इजिप्शियन संस्कृतीच्या मिश्रणाने झाली. या दोहोंचे मिश्रण झाले नसते अर्थात त्यांच्याच मैत्री प्रस्थापित झालीच नसती तर इतक्या जुन्या व प्राचीन भव्यतेच्या खुणा असलेल्या या समाज संस्कृती उभ्या राहिल्याचं नसत्या. जर हे खरे असेल तर येथे प्रश्न उपस्थित होतो की; त्यापूर्वी धर्म नव्हता का ? तर याचे उत्तर होय त्यापूर्वीही धर्म होता, असेच देता येईल. फक्त तत्कालीन धर्म हा एका मानवी टोळीवर दुसऱ्या मानवी टोळीने अमानवीय रीतीने आक्रमण करणे, माणसानेच माणसास मारणे आणि मरणे इतकेच स्वरूपाचा होता. माणूस अंधारात होता. मानवास हळूहळू या नेहमीच्या ऐच्छिक हिंसेचा (जी गरजेची नव्हती व ती टाळता ही आली असती) वीट येऊ लागला. हा विचार तत्कालीन मानवी समाजाच्या हिताचा अभूतपूर्व असाच होता. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास अर्थात मैत्री प्रस्थापित करण्यास मानवास कित्येक हजार वर्षे लागली. बघता बघता हा मैत्रीचा सूर्य संपूर्ण दिगंतात पसरू लागला. दिगंत म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी अर्थात जमिनीचा...

इतिहास : जेत्यांचा - पराजितांचा

नेहमी असे सांगितले जाते की इतिहास हा जेत्यांचा लिहिला जातो. यात तसे काही वावगे ही नाही म्हणा, ते खरेही आहे. कारण; हरलेल्यांचा इतिहास एखाद्याने लिहिला व त्यांच्यात नवचैतन्याने जिंकण्याची जिद्द निर्माण केली तरीही त्या इतिहासावर कोण विश्वास ठेवतो ? यामुळे काय होते, तर हरलेल्या पिढ्या त्यांच्या पुढील पिढ्यांनाही सतत हरण्याची सवय लागते. तर काय यामध्ये त्या इतिहासकाराची चुक आहे ? तर याचे उत्तर नाही असे आहे. किंबहुना असे म्हणावे वाटते की; सतत हरून विभागलेल्या कुणालाही हा इतिहास समजून घ्यायचा नाही आहे. कारण; सर्वच अंगांनी आता विभागले जे गेले आहेत. इतिहासात जे झाले ते झाले. इतिहासात झालेली चूक दुरुस्त करायची नामी संधी भारतीय म्हणून आपणावर येऊन पडलेली आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा गौरवशाली होता, भारत सोने की चिडिया... असे जेव्हा आपण भारतीय सतत म्हणत असतो. तेव्हा तो काळ आजपासून केवळ २५०० वर्षे इतकाच मागे नाही जात, तर त्याहीपूर्वी २५०० वर्षे अर्थात आजपासून ५००० वर्षे मागे जातो, आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या गौरवशाली इतिहासास पहिला धक्का बसला २५०० वर्षापूर्वी... आजपासून साधार...