मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

sopara लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सोपारा येथील ऐतिहासिक स्तूप...!!!

सोपारा हे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात स्थित आहे. ज्यास आज नालासोपारा असेसुद्धा ओळखले जाते. नालासोपारा हे मुंबईच्या जवळ असलेले एक वेगाने विकसित होणारे उपनगर असले, तरी या सोपाऱ्याचा प्राचीन इतिहास अत्यंत समृद्ध आहे. आज आपण सोपारा आणि येथील प्राचीन स्तूपाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी, आपण सोपाराच्या प्राचीन इतिहासावर एक संक्षिप्त दृष्टिक्षेप टाकूया. ज्या काळात मुंबई हे लहान-लहान बेटांमध्ये विभागलेले होते, त्या काळात सोपारा हे एक अत्यंत समृद्ध शहर तथा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक महत्त्वाचे बंदरही होते. येथून अरब, ग्रीक, रोम, मेसोपोटेमिया आणि आफ्रिकन देशांशी व्यापार केला जात असे. इसवी सन १५० मध्ये, ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ टॉलेमी याने आपल्या 'जिओग्राफी' (Geography) या ग्रंथात सोपारा हे नवसारी आणि चौल यांच्या दरम्यान वसलेले असल्याचे नमूद केले आहे. तसेच, पहिल्या शतकात रचलेल्या 'पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी' (Periplus of the Erythraean Sea) या ग्रंथात सोपारा हे ठिकाण भृगुकच्छ (सध्याचे भरूच) आणि कल्याण यांच्या दरम्यान असल्याचे नमूद करण...