मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

किल्ले गुमतारा - एकांतवासात दिवस कंठत असलेला अल्पपरिचित दुर्ग

काही ठिकाणांनी आपल्या भौगोलिक स्थानामुळे इतिहासात महत्वपूर्ण भूमिका बजावली असतात. पण पुढील काळात वाढत्या आधुनिकीकरण तसेच शहरीकरणामुळे हा इतिहास मागे पडत चालला असताना; ती ठिकाणे मात्र एकांतवासात हरवतात. शोधलीत तर अशी खुप ठिकाणे आपल्या अवतिभोवती दिसून येतील. अशाच अनेक ठिकाणांपैकी एक भिवंडीजवळील किल्ले गुमतारा होय. हरेंद्र मास्तर यांनी सदर किल्ल्याच्या भटकंतीसाठी आदल्या दिवशी विचारणा केली आणि खुप दिवस किल्ले भटकंती केली नसल्याने लागलीच होकार दिला. गुमतारा किल्ला हा कल्याण येथून ३१ किमी अंतरावर असून, कल्याण येथून भिवंडी - वाडा रोडवर वज्रेश्वरीच्या अलीकडे १० किमी अंतरावर दुगाड फाटा येथून आत दुगाड, मोहीली तसेच घोटेगाव गावाच्या हद्दीत उभा आहे. या किल्ल्याला घोटवड किल्ला, दुगाड किल्ला, गोतारा अशी आणखी काही नावे आहेत. चारही बाजूंनी घनदाट जंगलात उंच टेकडीवर असलेला हा किल्ला चढण्यास मध्यम श्रेणीचा असला तरीही या किल्ल्यावर जाणाऱ्या अनेक पायवाटा - ढोरवाटा हा मार्ग जिकरीचा करतात. जंगलटप्पा पार करून वरील भाग काहीसा निसरडा मुरुमाचा आहे. तेव्हा हा भाग करताना जरा जपून अन्यथा तुमची एक चूक तु...

चक्रवर्ती सम्राट अशोक यांची संबोधी स्थळास भेट

चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी राजाभिषेकानंतर दहाव्या वर्षी संबोधी (बोधगया) यात्रा केली होती, अशी नोंद सम्राटांनी कोरविलेल्या गिरनार येथील आठव्या शिलालेखात आहे. हा कालखंड अंदाजे ख्रिस्तपूर्व २६० मधील असावा. ज्या ठिकाणी सिद्धार्थ गोतम यांना संबोधी प्राप्त झाली, त्याठिकाणी बुध्दांच्या स्मरणार्थ महत्त्वाची विशेष वास्तू उभारावी या हेतूने सम्राट अशोक यांनी एका रत्नजडित वज्रासनाची स्थापना केली. यामागे त्यांचा हेतू मूळ संबोधी स्थळाची नेमकी जागा लोकांना कळून यावी हा होता. आज संबोधी स्थळ जे काही भव्यदिव्य दिसते त्याची वीट पहिल्यांदा रचणारे हे सम्राट अशोक होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या प्रसंगावर आधारित शिल्प सांची, भरहुत स्तूपाबरोबरच खालील जोडलेले जे चित्र आहे अशा सन्नती येथील भग्न स्तूपाच्या अवशेषावर देखील शिल्पांकित आहे. सदर चित्रात एक बोधिवृक्ष असून त्याखाली एक रिक्त आसन (वज्रासन) दिसून येते आहे. आसनाच्या खाली पादपिठावर धम्मचक्र वलयांकित बुद्धांचे धम्मकाया स्वरूपातील पदचिन्ह शिल्पित आहे. या वज्रासनास सहृदय वंदन करताना तसेच बोधिवृक्षास कमलपुष्प अर्पण करताना सम्राट अशोक दिस...

अपरान्ताचे लेणे… भाग २

अपरान्ताचे लेणे… भाग १  👈 इथे वाचा. कोंदिविटे लेणी, अंधेरी कोंदिविटे लेणी मुंबई उपनगरातील अंधेरीजवळ वेरावली पर्वतावर असलेला महत्वाचा लेणीसमूह असून हा लेणी समूह कान्हेरी लेणीचे उपकेंद्र म्हणून प्राचीनकाळी कार्यरत असावे. जवळच असलेल्या कोंदिविटे गावाच्या नावावरून या समुहास कोंडीविते लेणी असे म्हटले जाते. या लेणीला महाकाली लेणी असे दुसरे नावदेखील प्रचलित आहे. लेणीच्या पायथ्याशी महाकाली मंदिर असून या मंदिराच्या गाभाऱ्यात एक देवतेचे शिल्प कोरलेल्या काम्य-स्तुपाची पूजा महाकाली म्हणून केली जाते. त्या स्तुपावर असलेली वज्रयान पंथाची रक्षक देवता महाकाळच्या नावावरून या लेणीला महाकाली लेणी असे म्हटले जाते. इसवी सन पहिल्या ते सहाव्या शतकात कोरलेल्या १९ लेणींचा गट असून पूर्वेस १५ तर पश्चिमेस ४ लेण्या आहेत. यात चैत्यगृह, भिक्खु विहार,पानपोढी यांचा समावेश होतो. यातील क्रमांक ९ ची लेणी हे चैत्यगृह प्रकारातील असून यातील थेरवाद कालीन स्तूप एका विशिष्ट वर्तुळाकार रचनेच्या आत असलेला दिसतो. त्या भिंतीला दोन्ही दिशेला मूळ दगडात कोरलेल्या जाळीदार खिडक्या असून डाव्या बाजूच्या खिडकीव...

अपरान्ताचे लेणे… भाग १

अपरान्त म्हणजे पश्चिमेचा अंत… अर्थात जिथे पश्चिम दिशेचा अंत होतो असा प्रदेश अथवा देश म्हणून प्राचीनकाळी या कोंकण प्रदेशास अपरान्त म्हणून ओळखले जात होते. प्राचीन साहित्यात या अपरान्त देशाच्या व्याप्तीविषयी एकवाक्यता नसल्याने याचे निश्चित स्थान ठरवणे कठीण आहे. तरीदेखील तापी नदीच्या मुखाच्या दक्षिणेकडील आणि चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या उत्तरेकडील प्रदेशास प्राचीनकाळी अपरान्त असे म्हटले जात असावे. तसेच; काही अभ्यासकांच्या मते अपरान्त म्हणजे मुंबईपासून ठाणे, नाशिक, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान आणि सिंध असा विस्तृत प्रदेश असावा. सम्राट अशोक यांनी आपल्या कार्यकाळात भरवलेल्या तिसऱ्या धम्मसंगितीची एक क्रांतिकारक निर्णय घेतला. आपल्या राज्यातील प्रजा नीतीने वागते आहे की नाही, हे पाहण्यासाठी व धम्माचे योग्य पालन करण्यासाठी मार्गदर्शनार्थ वेगवेगळ्या प्रदेशात धम्ममहामात्रांची नियुक्ती केली होती. त्यापैकी; अपरान्तात योनधम्मरक्खित नामक स्थविरास पाठवले असा उल्लेख प्राचीन बौद्ध साहित्य महावंसमध्ये सापडतो. हा अपरान्त प्रदेश पश्चिम महाराष्ट्रापासून वेगळा होण्याचे कारण म्हणजे उत्तर – दक्षिण अशी प...