आजच्या आधुनिक काळात एखाद्या महत्वाच्या स्थळाला भेट देतेवेळी, त्या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी मोबाईलद्वारे किंवा कॅमेराच्या साहाय्याने तुम्ही तुमचे छायाचित्र काढता किंवा "त्यात मी दिसलो पाहिजे" या उद्देशाने त्या स्थळावर वेगवेगळ्या शैलीत आपले फोटो समोरच्याकडून काढून घेत असता. काय बरोबर ना...?
हे करत असता कधीकधी काय होतं... फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक समोरून सरळ काढ, तर कधी हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच बघताना किंवा बघण्याचे नाटक करून फोटो क्लिक करायला सांगता. यालाच आजच्या आधुनिक जगात #candidphotography असे सुद्धा म्हणतात. ही अशा पद्धतीची कँडिड फोटोग्राफी करत असताना आपण आपली उभी राहण्याची लकब, ढब (pose) यात बदल करत असतो आणि आपल्याला पाहिजे तसे आपले #photoshoot करून घेतो. तुम्हाला काय वाटतं ? Candid Photography ही आजची आहे ?? तर तुम्ही चुकत आहात. कारण; छायाचित्र काढण्याची किंवा काढून घेण्याची शैली ही आजपासून २००० वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्त्वात होती. आता तुम्ही म्हणाल, रोहित काय वेड्यात काढतोय ? प्रश्न उपस्थित कराल की, कॅमेरा किंवा कॅमेराचा मोबाईल या सारख्या उपकरणाचा शोध ध्यानीमनी सुद्धा नव्हता. मग हे कसे शक्य आहे... ?? सांगतो...सांगतो... तेव्हाच्या कलाकारांनी ही आठवण दगडावर शिल्पाच्या स्वरूपात चित्रित अर्थात शिल्पीत करून ठेवली. हे म्हटल्यावरही तुम्हाला अजूनही माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल. तर तुमच्या भेटीला वर जोडलेले छायाचित्र तुमचा विश्वास बसावा यासाठी आणले आहे.
वरील चित्रात दिसत असलेल्या शिल्पपटात मध्यभागी बुध्द प्रलंबपाद अवस्थेत धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत कमळपुष्प आसनाधिष्टित मंचकावर विराजमान असून कमळ पुष्पाच्या देठाला नागराजे आधार देताना दिसत आहे. या महत्वाचा शिल्पावर माझ्यापेक्षा ज्येष्ठ महानुभावांनी वेळोवेळी लिहिले आहेच. तर या शिल्पाच्या दोन्ही बाजूला असलेल्या युगुलाकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे फोटोग्राफर ला तुम्ही सांगता एक फोटो समोरून सरळ काढ त्याप्रमाणे चित्रातील डाव्या बाजूचे युगुलशिल्प हे शिल्पबद्ध झाले असून यामध्ये युगुल समोर बघत असून दोघांपैकी स्त्रीने आपला डावा पाय थोडे मागच्या बाजूला नेत आपल्या पुरुष जोडीदाराच्या कमरेला आपला डावा हात घातलेला दिसतो. तर उजवा हात मात्र तिच्या कमरेवर असावा. शिल्प भग्न झाले असल्याने ते आता दिसून येत नाही. तसेच; Candid Photography करताना हलकेच कॅमेऱ्यापासून मान व नजर हलवून दुसरीकडेच कटाक्ष टाकताना किंवा तसे नाटक करून फोटो क्लिक करायला तुम्ही जसे सांगता ते करताना मात्र तुम्ही तुमच्या उभी राहण्याची लकब, ढब यात बदल करता अगदी त्याप्रमाणेच उजव्या बाजूच्या शिल्पातील मूळ युगुलाने ही कृती तंतोतंत पार पाडत candid photography ची ही मागणी शिल्पकाराकडे (तत्कालीन छायाचित्रकार) केली असावी व यातूनच या उजव्या बाजूच्या युगुलाच्या शिल्पाची निर्मिती झाली असावी. बुद्ध शिल्पाच्या दोन्ही बाजूला उभे युगुलशिल्प हे मूळच्या एकाच अनामिक दानतात्यांचे दोन वेगवेगळ्या pose मध्ये असलेले शिल्प आहे, असे माझे ठाम मत आहे. खोटे वाटतं असेल तर तुम्ही त्या युगुलाचे चेहरे, फेटे, अधोवस्त्र, स्त्रीने धारण केलेला कमरपट्टा, डोक्यावरील बिंदी, तिची केशरचना हे सर्व सर्व पाहू शकता.
काय आता तरी बसला विश्वास...?? मला काय ते सांगा आणि हे शिल्प कोणत्या लेणीत आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा.
#चला_समजून_घेऊ_शिल्पांची_भाषा
✍️ Rohit R. Bhosale
खुप छान उपक्रम...
उत्तर द्याहटवाधन्यवाद 😊
हटवाछान 😇
उत्तर द्याहटवाधन्यवाद 😊
हटवाSuper Sir ji 🙏❤️
उत्तर द्याहटवाधन्यवाद 😊
हटवा