यज्ञाच्या अनुषंगाने केलेली मांडणी व पुरातत्वशास्त्राचे जाणकार अभ्यासक बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित इतिहास संशोधनावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ क्रांती आणि प्रतिक्रांती आपणापैकी बहुत जणांनी वाचला असेल, त्याचे अध्ययन केले असेल. त्यांच्या याच प्रसिद्ध ग्रंथातील एक परिच्छेद पुढीलप्रमाणे असून मी तो, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड ३, पृ. क्रं. १७४ (इंग्रजी आवृत्ती) मधून घेतला आहे. तो परिच्छेद पुढीलप्रमाणे...
त्याचे मराठीत भाषांतर काहीसे असे आहे... " प्रत्येक यज्ञाचा अर्थ पुरोहितासाठी दक्षिणा असा होता. शुल्काच्या बाबतीत, नियम अचूक होते आणि त्यांचे प्रवर्तक निर्लज्ज होते. पुरोहित केवळ दक्षिणासाठी यज्ञ करीत असे आणि त्यात मौल्यवान वस्त्रे, गायी, घोडे किंवा सोन्याचा समावेश असणे आवश्यक आहे. जेव्हा प्रत्येक दक्षिणा काळजीपूर्वक नमूद केले गेले होते. पुरोहितांनी यज्ञाचे एक मोठे जाळे तयार केले होते, जिथे प्रत्येक वळणावर दक्षिणा आकारली जात असे. ज्याच्या फायद्यासाठी बलिदान दिले गेले त्या एका व्यक्तीवर पडणारा संपूर्ण खर्च प्रचंड असावा. संपूर्ण गोष्ट किती महाग झाली हे यावरून दिसून येते की; एका ठिकाणी बलिदानाची दक्षिणा एक हजार गायी म्हणून नमूद केली आहे. या लोभासाठी, जो इतका पुढे गेला की त्याने घोषणा केली की जो एक हजार गायी देतो त्याला स्वर्गातील सर्व गोष्टी मिळतात. पुरोहिताकडे कडे स्वर्गातील देवांचा उल्लेख करण्यासाठी एक चांगला दाखला होता, कारण त्यांच्याबद्दल सांगितलेल्या सर्व कथांमध्ये, ते त्यांच्या शेजारील देवांना मदत करतात तेव्हा नेहमी एकमेकांकडून बक्षिसाची मागणी करतात. जर देव बक्षिसे मागत असतील, तर पुरोहितालाही तसे करण्याचा अधिकार आहे.
तर मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रसिद्ध ग्रंथातील या परिच्छेदातील काही ओळीच्या अनुषंगाने काही प्रश्नाची उत्तरे पाहिजे आहे.
1) "पुरोहित केवळ दक्षिणासाठी यज्ञ करीत असे आणि त्यात मौल्यवान वस्त्रे, गायी, घोडे किंवा सोन्याचा समावेश असणे आवश्यक आहे."
2) "... एका ठिकाणी बलिदानाची दक्षिणा एक हजार गायी म्हणून नमूद केली आहे."
3) "...पुरोहिताकडे कडे स्वर्गातील देवांचा उल्लेख करण्यासाठी एक चांगला दाखला होता."
या वरील ओळींच्या संदर्भाने विचारायचे आहे की; हा संदर्भ कुठे नमूद आहे, हे मला कोणी सांगेल का? मला वाटतं लेण्यातील शिलालेख वाचणारे हे सांगू शकतात. मला ते माहित आहे. ...आणि होय, हे सर्व पुरावे एकाच ठिकाणी नमूद आहेत. त्याचे उत्तर नाणेघाट येथील ऐहिक लेणे असे आहे.
रोहित राजेंद्र भोसले.
दिनांक :- ०७ ऑक्टोबर २०२५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा