मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कल्याण येथील लोनाड गावातील चौधरपाडा येथील केशिदेव द्वितीय याचा शिलालेख

आजचे कल्याण हे प्राचीन काळी अत्यंत महत्वाचे बंदर होते. कल्याणचा उल्लेख कान्हेरी लेणीमध्ये कलीयान, कलीअण, कल्याण अशा अनुषंगाने तब्बल नऊ वेळा आला आहे. हे सर्व शिलालेख इ.स. च्या पहिल्या, दुसऱ्या, पाचव्या तसेच सहाव्या शतकात कोरण्यात आलेले आहे. यांपैकी, दोन शिलालेखात कल्याण येथील अंबालिका बौद्ध विहाराचा दान दिल्याचा उल्लेख आला आहे. हे कल्याण उल्हासनदीच्या खाडीकिनारी वसलेले असून इथे मलंगगड, ताहुली यांसारखे शिखरे असून, १७ व्या शतकात ऑक्टोबर १६५४ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण वर स्वारी करून सदर प्रदेश स्वराज्यात आणला. तसेच, कल्याण खाडीकिनारी दुर्गाडी किल्ल्याची उभारणी करून मराठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. तसेच, लोनाड येथील इ.स. ६ व्या शतकातील बुद्ध लेणी, तसेच लोनाड गावातील इ.स. ११ व्या शतकातील लवणादित्य मंदिर अशी काही प्राचीन पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. अशा या कल्याण चा इतिहास सांगू तेवढा कमीच आहे.  लोनाड गावातील चौधरपाडा येथील शिवपार्वती मंदिर आज आपण सदर ब्लॉग च्या माध्यमातून कल्याण येथील लोनाड गावातील चौधरपाडा येथील इ.स. १३ व्या शतकातील एका शिलालेखाची माहिती जाऊन घेणार...

Hal Khurd Caves | दुर्लक्षित हाळ खुर्द लेणी, खोपोली

हाळखुर्द बौद्ध लेणी सर्वप्रथम मी या पोस्ट च्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की; जे - जे प्रसिद्ध आहे; त्या वास्तू अथवा ठिकाणांना भेटी देण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. त्या स्थळांना वारंवार भेटी दिल्या जातात. परंतु; काही ठेवा असा देखील आहे, जो वर्षानुवर्षे आपल्या अस्तित्वाची लढाई या निसर्ग चक्रात एकटाच लढतो आहे. ऊन, वारा, पावसाच्या माऱ्यात शतकानुशतके कोणा वाटसरू अथवा पामराची वाट पाहत तिष्ठत उभा आहे. आपल्या मनीच्या गतकालीन वैभवाच्या गोष्टी ऐकण्यास जणू काही कोण तरी येईल आणि त्यास मी खुल्या मनाने, ओतप्रोत माहितीचा खजिना रिता करेन.... ! हेच तर त्या वास्तु बोलत नसतील ना ?? कधी हाकली आहे का त्यांची हाक ?? कधी साधला आहे का त्यांच्याशी संवाद ??.... मी ऐकलं आहे आज अशाच एका प्राचीन वास्तूची कथा...आज आम्ही इतकी माणसे त्या वास्तूवर एकत्र बघून ती वास्तू किती सुखावली असेल म्हणून सांगू...?मी तरी आज त्या वास्तूवर, तिच्या मनीच्या गुजगोष्टी ऐकून भारावलो. तिच्याशी मनातल्या मनात संवाद साधू लागलो. त्या वास्तूला एकेक प्रश्न विचारू लागलो, आणि ती वास्तूदेखील माझ्याशी बोलू लागली. तिच्या प्राचीन वैभ...

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी व शिलालेख... किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला आंबिवली बौद्ध लेणी वाचकमित्रांनो, मी रोहित भोसले माझ्या ब्लॉग वर तुमचे सहर्ष स्वागत करतो आहे. काल दिनांक ०३ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला भेटीचा योग आला. यापूर्वी दोन वेगवेगळ्या मित्रांसोबत कोथळीगड पाहून झाला आहे. परंतु, जॉनी व अनंता ( जे आजच्या भेटीत सोबत होते ) यांनी कोथळीगड पाहण्याची इच्छा व्यक्त केली मग लागलीच आम्ही कोथळीगड भेटीस निघालो.   कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आंबिवली गावाजवळ आहे. कर्जत स्थानकापासून किल्ल्याच्या पायथ्याचे अंतर हे सुमारे २९ किमी असून तर नेरळपासून २७ किमी इतके आहे. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून कुसुर घाटमार्गाने मालवाहतूक घाटावरच्या गावाशी जोडलेल्या ह्या घाटमार्गाने होत होती. यामुळे, या घाटमार्गावर चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तेवढ्याच बळकट संरक्षक दुर्गांची निर्मिती झाली. त्यातील च एक आकाराने लहान तरीही महत्वपूर्ण असा कोथळीगड उर्फ पेठच्...

शिवनेरी बौद्ध लेणी - जुन्नर

प्रस्तावना:- महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. अभ्यासकांच्या मते संपूर्ण भारत भर सुमारे १२०० नोंद लेणी असून त्यामधील सुमारे ९०० ते १००० लेण्या ह्या एकट्या महाराष्ट्रात आहे. या इतक्या मोठ्या प्रमाणावर लेणी इथे महाराष्ट्रात कोरल्या गेल्या, काय कारण असेल बरे ? पुढे जाऊन अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, भारताच्या लिखित इतिहासाची सुरुवातच मुळात बौद्ध सम्राट अशोकांच्या शिलाशासनापासून होते, असे अभ्यासक अथवा पुरातत्व शास्त्राद्वारे मानले जाते. बिहार येथील बाराबार डोंगररांगेत आजीवक साठी पहिली लेणी कोरली. श्रमण परंपरेतील चारिका करणाऱ्या भिक्खुंसाठी वर्षावासात निवासासाठी लेण्यांची निर्मिती ही मुळात सम्राट अशोकांच्या काळात सुरू झाली. पुढे जाऊन बौद्धधम्म/ मताचा प्रचार व प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर आदरणीय भिक्खूगण विंध्य-नर्मदा पार करून ह्या महाराष्ट्रात उतरले. सह्याद्रीतील कातळकडे बघून त्यांच्या मनात अक्षरशः धुमारे फुटले असतील. दक्खनच्या पठारावरील अग्निजन्य (बेसाल्ट) खडक हा लेनिनिर्मितीसाठी अनुकूल असा होता. तर केवळ अग्निजन्य खडक असून लेणी निर्मि...