एकदशमुख अवलोकितेश्र्वर धारणी सूत्र हा बौद्ध धम्मातील एक महत्त्वाचा संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. या संस्कृत सुत्ताचे भाषांतर प्रथमतः संस्कृत मधून चायनीज भाषेत झाले असून ते इसवी सनाच्या ६५६ मध्ये जगद्विख्यात चायनीज भिक्खू ह्यु - एन - त्सांग (XUAN XANG) यांनी केले आहे. या संस्कृत सूत्रावर आधारित अकरा डोकी व अनेक हात असलेली एकदशमुख अवलोकितेश्र्वर बोधिसत्वाचे शिल्प तयार करण्यात आलेले आहे. महायान व वज्रयान काळातील मान्यतेनुसार अकरा डोकी व अनेक हात असलेली अवलोकितेश्र्वर बोधिसत्व देवता प्रसिद्धी पावली होती. अनेक डोकी असण्यामागे अशी धारणा होती की, आपले भक्त, अनुयायांसाठी तथा भूतलावरील प्रत्येक प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी हरतऱ्हेने बोधिसत्व अवलोकितेश्र्वर लक्ष ठेऊन आहेत. तसेच अनेक हात मागील धारणा अशी की; जगाच्या कल्याणासाठी तसेच दुःख दूर करण्यासाठी सर्वप्रकारे सक्षम आहेत. हे बोधिसत्व बुद्धत्वप्राप्तीच्या मार्गावर असून समस्त भूतलावरील प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी अनिश्चित काळासाठी ते बुद्धत्व प्राप्ती लांबणीवर टाकतात, अशी संकल्पना महायान, वज्रयान कालखंडात पराकोटीवर होती. वरील उ...
नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीत भटकंती करताना त्यातील गडकिल्ले, लेण्या यांचा माहितीपर प्रवासवर्णन तसेच मी भेटी दिलेल्या काही प्रसिद्ध ठिकाणे, पर्यटन स्थळांची माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे.