मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एकदशमुख अवलोकितेश्र्वर धारणी सूत्रावर आधारित एकदशमुख अवलोकितेश्र्वर बोधिसत्व

एकदशमुख अवलोकितेश्र्वर धारणी सूत्र हा बौद्ध धम्मातील एक महत्त्वाचा संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. या संस्कृत सुत्ताचे भाषांतर प्रथमतः संस्कृत मधून चायनीज भाषेत झाले असून ते इसवी सनाच्या ६५६ मध्ये जगद्विख्यात चायनीज भिक्खू ह्यु - एन - त्सांग (XUAN XANG) यांनी केले आहे. या संस्कृत सूत्रावर आधारित अकरा डोकी व अनेक हात असलेली एकदशमुख अवलोकितेश्र्वर बोधिसत्वाचे शिल्प तयार करण्यात आलेले आहे. महायान व वज्रयान काळातील मान्यतेनुसार अकरा डोकी व अनेक हात असलेली अवलोकितेश्र्वर बोधिसत्व देवता प्रसिद्धी पावली होती. अनेक डोकी असण्यामागे अशी धारणा होती की, आपले भक्त, अनुयायांसाठी तथा भूतलावरील प्रत्येक प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी हरतऱ्हेने बोधिसत्व अवलोकितेश्र्वर लक्ष ठेऊन आहेत. तसेच अनेक हात मागील धारणा अशी की; जगाच्या कल्याणासाठी तसेच दुःख दूर करण्यासाठी सर्वप्रकारे सक्षम आहेत. हे बोधिसत्व बुद्धत्वप्राप्तीच्या मार्गावर असून समस्त भूतलावरील प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी अनिश्चित काळासाठी ते बुद्धत्व प्राप्ती लांबणीवर टाकतात, अशी संकल्पना महायान, वज्रयान कालखंडात पराकोटीवर होती. वरील उ...

देवलोळी बदलापूर येथील १७ व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण अशी शिवकालीन चावीच्या आकाराची विहीर

तर २३ तारखेला हरेंद्र कांबळे यांचा फोन आला की; उद्या कुठे आहे म्हणून...? मी देखील उत्तरलो, काही ठरलं नाही आहे. तर ते मला म्हणाले जाऊया का उद्या बदलापूर ला एके ठिकाणी आणि मी लागलीच होकार दिला. तर ते ठिकाण होते, बदलापूर येथील देवलोळी गावात असलेली चावीच्या आकाराची विहीर अथवा बारव चे... दिनांक २४ जून ला ठरल्याप्रमाणे सकाळी ८ वाजता आम्ही दोघे बदलापूर कडे निघालो. घरून निघतो न निघतोच जोराचा पाऊस सुरू झाला. पावसाचा आनंद घेत आमचा प्रवास दुचाकीवरून बदलापूर कडे सुरू होता. तासाभरात आम्ही बदलापूर पश्चिमेला बदलापूर गावाच्या पुढे अंदाजे ४.५ किमी अंतरावर असलेल्या देवलोळी गावात येऊन पोहोचलो होतो. याच गावात आहे ही मध्युगीन काळातील ऐतिहासिक बारव. आम्ही जेव्हा गावात पोहोचलो तेव्हा पाऊस हलकासा रिमझिम बरसत होता. आता आम्ही विहिरीकडे येऊन उभे ठाकलो होतो. मध्ययुगीन कालखंडातील अंदाजे १७ व्या शतकातील ही विहीर बदलापूर चे ऐतिहासिकृष्ट्या महत्व अधोरेखित करत येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटक अथवा इतिहास प्रेमींना दर्शन देत आजही तितक्याच दिमाखात उभी आहे. या विहिरीच्या बांधणीचा कालखंड आणि त्यासंबंधीचा इतिहास समजण्य...

महाराष्ट्राचा प्राचीन इतिहासाचा धांडोळा (इ.स. १३०० पर्यंत)

सर्व मराठी मनास आणि जनास ६३ व्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या मंगलमय सदिच्छा. 🙏🙏🙏 महाराष्ट्र हा महाराष्ट्र म्हणून कधी उदयास आला ? त्यास महाराष्ट्र हे नामाभिधान केव्हा प्राप्त झाले, सांगता येईल काय ? तर चला आज महाराष्ट्र दिनी त्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे भाषावार राज्यांची विभागणी होऊन मराठी भाषिकांसाठी केवळ एकमात्र राज्य दिनांक १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले. त्यासाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी या चळवळीत सुमारे १०६ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्या सर्व ज्ञात अज्ञात हौतात्म्याना विनम्र अभिवादन करून आज संपूर्ण महाराष्ट्र मधील मराठी जन आणि मन ६३ वा महाराष्ट्र दिन साजरा करत आहे. आता जसा एकसंध महाराष्ट्र आपणास दिसतो, तसे राजकिय दृष्ट्या एकसंध महाराष्ट्र राज्य कधीच अस्तित्वात न्हवते. हे महाराष्ट्र आताच्यासारखे एकसंध न्हवते मग ते कसे होते. येथील प्रदेशाला कोणते नाव होते? प्राचीन काळात आताच्या महाराष्ट्राचे स्वरूप कसे होते. यांसंबंधीचे प्राचीन उल्लेख कुठे- कुठे आलेले आहेत. सदर माहिती जाणून घेण्या...

मावळातील पाटण लेणी - एक विलक्षण सुंदर अनुभव

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यापाठोपाठ कदाचित मावळ तालुक्यातील डोंगरकपारीत सर्वाधिक लेण्या असाव्यात... नव्हे त्या आहेच. मावळ मध्ये काही सुप्रसिद्ध, तर काही अल्पपरिचित तर काही अजूनही अपरिचित अशा लेण्या आहेत. त्यामध्ये; कामशेत जवळची बेडसे लेणी, मळवली जवळील भाजे गावातील भाजे लेणी, पाटण गावातील भातराशी शिखराच्या पोटातील पाटण चा लेणी समूह, दुर्तगती महामार्गाच्या पलीकडे कार्ले बौद्ध लेणी, घोरावडेश्वर लेणी, पाल, उकसन लेणी यांसारख्या परिचित व काही अजूनही पर्यटक अभ्यासकांच्या नजरेतून दूर असलेल्या असंख्य लेण्या आहेत. यापैकी, पाटण गावाच्या डोंगराच्या मागे भातराशी शिखराच्या पोटातील पाटण लेणीची सफर व माहिती जाऊन घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तुम्ही जर मुंबईहुन रेल्वेने येणार असाल तर लोणावळा या स्थानकावर उतरावे. लोणावळ्याच्या पुढे पुणे येथे जाणाऱ्या लोकल असून ( ठराविक अंतराने) या लोकलद्वारे लोणावळ्याच्या पुढील मळवली या स्थानकावर उतरावे. स्थानकाच्या फलाट क्रमांक २ च्या दिशेने बाहेर आल्यावर मुंबई- पुणे दुर्तगती महामार्गावरून जाणारा ब्रिज उतरून डाव्या बाजूला ज...

कल्याण येथील लोनाड गावातील चौधरपाडा येथील केशिदेव द्वितीय याचा शिलालेख

आजचे कल्याण हे प्राचीन काळी अत्यंत महत्वाचे बंदर होते. कल्याणचा उल्लेख कान्हेरी लेणीमध्ये कलीयान, कलीअण, कल्याण अशा अनुषंगाने तब्बल नऊ वेळा आला आहे. हे सर्व शिलालेख इ.स. च्या पहिल्या, दुसऱ्या, पाचव्या तसेच सहाव्या शतकात कोरण्यात आलेले आहे. यांपैकी, दोन शिलालेखात कल्याण येथील अंबालिका बौद्ध विहाराचा दान दिल्याचा उल्लेख आला आहे. हे कल्याण उल्हासनदीच्या खाडीकिनारी वसलेले असून इथे मलंगगड, ताहुली यांसारखे शिखरे असून, १७ व्या शतकात ऑक्टोबर १६५४ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण वर स्वारी करून सदर प्रदेश स्वराज्यात आणला. तसेच, कल्याण खाडीकिनारी दुर्गाडी किल्ल्याची उभारणी करून मराठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. तसेच, लोनाड येथील इ.स. ६ व्या शतकातील बुद्ध लेणी, तसेच लोनाड गावातील इ.स. ११ व्या शतकातील लवणादित्य मंदिर अशी काही प्राचीन पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. अशा या कल्याण चा इतिहास सांगू तेवढा कमीच आहे.  लोनाड गावातील चौधरपाडा येथील शिवपार्वती मंदिर आज आपण सदर ब्लॉग च्या माध्यमातून कल्याण येथील लोनाड गावातील चौधरपाडा येथील इ.स. १३ व्या शतकातील एका शिलालेखाची माहिती जाऊन घेणार...

Hal Khurd Caves | दुर्लक्षित हाळ खुर्द लेणी, खोपोली

हाळखुर्द बौद्ध लेणी सर्वप्रथम मी या पोस्ट च्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की; जे - जे प्रसिद्ध आहे; त्या वास्तू अथवा ठिकाणांना भेटी देण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. त्या स्थळांना वारंवार भेटी दिल्या जातात. परंतु; काही ठेवा असा देखील आहे, जो वर्षानुवर्षे आपल्या अस्तित्वाची लढाई या निसर्ग चक्रात एकटाच लढतो आहे. ऊन, वारा, पावसाच्या माऱ्यात शतकानुशतके कोणा वाटसरू अथवा पामराची वाट पाहत तिष्ठत उभा आहे. आपल्या मनीच्या गतकालीन वैभवाच्या गोष्टी ऐकण्यास जणू काही कोण तरी येईल आणि त्यास मी खुल्या मनाने, ओतप्रोत माहितीचा खजिना रिता करेन.... ! हेच तर त्या वास्तु बोलत नसतील ना ?? कधी हाकली आहे का त्यांची हाक ?? कधी साधला आहे का त्यांच्याशी संवाद ??.... मी ऐकलं आहे आज अशाच एका प्राचीन वास्तूची कथा...आज आम्ही इतकी माणसे त्या वास्तूवर एकत्र बघून ती वास्तू किती सुखावली असेल म्हणून सांगू...?मी तरी आज त्या वास्तूवर, तिच्या मनीच्या गुजगोष्टी ऐकून भारावलो. तिच्याशी मनातल्या मनात संवाद साधू लागलो. त्या वास्तूला एकेक प्रश्न विचारू लागलो, आणि ती वास्तूदेखील माझ्याशी बोलू लागली. तिच्या प्राचीन वैभ...

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी

किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला व आंबिवली बुद्ध लेणी व शिलालेख... किल्ले कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला आंबिवली बौद्ध लेणी वाचकमित्रांनो, मी रोहित भोसले माझ्या ब्लॉग वर तुमचे सहर्ष स्वागत करतो आहे. काल दिनांक ०३ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला भेटीचा योग आला. यापूर्वी दोन वेगवेगळ्या मित्रांसोबत कोथळीगड पाहून झाला आहे. परंतु, जॉनी व अनंता ( जे आजच्या भेटीत सोबत होते ) यांनी कोथळीगड पाहण्याची इच्छा व्यक्त केली मग लागलीच आम्ही कोथळीगड भेटीस निघालो.   कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आंबिवली गावाजवळ आहे. कर्जत स्थानकापासून किल्ल्याच्या पायथ्याचे अंतर हे सुमारे २९ किमी असून तर नेरळपासून २७ किमी इतके आहे. प्राचीन काळी कल्याण व ठाणे बंदरातून कुसुर घाटमार्गाने मालवाहतूक घाटावरच्या गावाशी जोडलेल्या ह्या घाटमार्गाने होत होती. यामुळे, या घाटमार्गावर चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तेवढ्याच बळकट संरक्षक दुर्गांची निर्मिती झाली. त्यातील च एक आकाराने लहान तरीही महत्वपूर्ण असा कोथळीगड उर्फ पेठच्...